जागतिक एड्स दिनानिमित्त दयानंद वाणिज्य महाविद्यालयात जनजागृती रॅलीचे आयोजन..*
दि. ०१ डिसेंबर, २०२२ रोजी दयानंद वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालयात जागतिक एड्स दिना निमित्त राष्ट्रीय सेवा योजना विभागा अंतर्गत एच.आय.व्ही / एड्स जनजागृती रॅली काढण्यात आली. या रॅलीस महाविद्यालयाच्या पर्यवेक्षिका डॉ. अंजली बुरांडे-कोरे व समन्वयक प्रा. सुभाष मोरे यांची प्रमुख उपस्थिती होती. सदर रॅलीचा मार्ग दयानंद शिक्षण संस्था ते श्रीमती सुशीलादेवी देशमुख महाविद्यालय प्रांगण असा होता. सदरील रॅलीस संबोधित करण्यासाठी जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालया मार्फत जिल्हा नियंत्रण विभागाने विविध पथनाट्य व जनजागृती विषयक कार्यक्रमाचे सादरीकरण केले. जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालय यांच्या आदेश अंतर्गत ही रॅली भाग्य नगर मार्ग ते श्रीमती सुशीला देवी महाविद्यालय प्रांगण येथे काढण्यात आली व रॅलीची सांगता करण्यात आली.
या रॅलीस महाविद्यालयातील कार्यक्रमाधिकारी प्रा. दिपक वेदे, प्रा. अमीर शेख, प्रा. श्रीकृष्ण जाधव ,प्रा. अंजली गाडे, डॉ. ज्योती कुलकर्णी, प्रा. सोनाली कुलकर्णी ,प्रा. शिल्पा बनसुडे, व कार्यालयीन अधीक्षक फैयाज पठाण व शिक्षक व कर्मचारी, रा. से. यो स्वयंसेवक विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते