लातूर येथे दयानंद वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालयात टॅली विषयावर व्याख्यानाचे आयोजन

दयानंद वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालयात टॅली या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थान पर्यवेक्षिका डॉ. अंजली बुरांडे यांनी भूषवले. तसेच मंचावर बी. सी.ए विभाग प्रमुख प्रा. शशिकांत स्वामी, समन्वयक प्रा. सुभाष मोरे तसेच प्रमुख व्याख्याते म्हणून प्रा. डी.जे. शेख उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. रेणुका महाळंगीकर यांनी केले. यानंतर प्रा. सुभाष मोरे यांनी आपले मनोगतात व्यक्त करताना सांगितले की, आपण मॅन्युअल अकाउंटिंग करतो परंतु टॅली सॉफ्टवेअर मध्ये टेक्निकली करण्यासाठी जे ज्ञान आवश्यक आहे ते या सेमिनारच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न केला जात आहे. प्रा. शशिकांत स्वामी यांनी आपले मत व्यक्त करताना, विद्यार्थ्यांना तांत्रिकदृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी अशाच पाच सेमिनारचे आयोजन करण्यात येणार आहे. ज्यामध्ये बारावीच्या अभ्यासक्रमाशी निगडित विषयावर व प्रायोगिक ज्ञानावर आधारित कौशल्यपूर्ण मार्गदर्शन करण्यात येणार आहे असे सांगितले.
यानंतर प्रत्यक्ष व्याख्यानात प्रा. डी.जे. शेख यांनी व्यापार म्हणजे काय? व्यवसायाचे मुख्य तीन प्रकार असतात उत्पादक संघटना, व्यापार संघटना, सेवा संघटना यांचा मुख्यत्वे समावेश होतो. यामध्ये सेवा क्षेत्रातील अकाउंटिंग, ट्रेडिंग आणि उत्पादक क्षेत्रातील अकाउंटिंग यांचा क्रम लागतो.परंतु या सर्वांसाठी टॅली या सॉफ्टवेअरच्या माध्यमाने आपण अतिशय कमी वेळात आणि अचूक पद्धतीने हे कार्य करू शकतो असे प्रभावी मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमासाठी बारावी वर्गातील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते तसेच महाविद्यालयातील प्राध्यापक व कर्मचारी वर्ग उपस्थित होता. आय. टी. विभागाचे प्रा. ए.ए. आदमाने, प्रा. एस. एस. कुलकर्णी, प्रा.एन.ए.परदेशी हे उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचलन व आभार प्रदर्शन प्रा. सुवर्णा कारंजे यांनी केले.