दहावीची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांसाठी वाणिज्य शाखेतील करिअरच्या संधी या विषयावर कार्यशाळेचे आयोजन..

नवीन शैक्षणिक धोरण प्रभावीपणे राबविणे हे सर्वच शाळा- महाविद्यालयांसाठी अव्हानात्मक कार्य आहे. हे कार्य यशस्वीपणे पार पाडण्यासाठी सर्व शैक्षणिक संस्थांना एकत्र येऊन एकमेकांच्या सहकार्याने कार्य करण्याची गरज आहे. या धोरणामुळे शिक्षण क्षेत्रात अमुलाग्र बदल होणार असल्याचे दिसून येते. याबाबत विद्यार्थी व पालकांमध्ये देखील संभ्रमाचे वातावरण आहे.

दहावीची परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांचे पुरेशा माहिती अभावी मेडिकल व इंजिनिअरिंग मध्ये करिअर करण्यासाठी प्राधान्य असते. परंतु बदलत्या काळात व स्पर्धात्मक परिस्थितीत पारंपारिक शिक्षणापेक्षा व्यावसायिक शिक्षण घेऊन कौशल्य विकास करण्याची आज गरज आहे. पालक व विद्यार्थ्यांमध्ये करिअरच्या विविध संधी विषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी दूरदृष्टी ठेवून वाटचाल करणाऱ्या व सातत्याने नवनवीन उपक्रम राबविण्यात अग्रेसर असणाऱ्या दयानंद शिक्षण संस्था संचलित, दयानंद वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालय लातूर येथे दहावीची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांसाठी वाणिज्य शाखेत उपलब्ध असलेल्या करिअरच्या विविध संधी विषयी सविस्तर माहिती देण्यासाठी दि. २५ एप्रिल रोजी दुपारी ४:०० वाजता कार्यशाळेचे आयोजन दयानंद सभागृहात करण्यात आले आहे.

 

•व्याख्यानाची ठळक वैशिष्ट्ये•

• बँकिंग (Banking)
• फायनान्स (Finance)
• कर क्षेत्र (Taxation)
• अकाउंटिंग (Accounting)
• इन्शुरन्स (Insurance)
• मार्केटिंग (Marketing)
• ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट (HRM)
• शेअर मार्केट (Share Market) आदी.. क्षेत्राशी निगडित विषयावर सखोल मार्गदर्शन..!

•प्रमुख व्याख्याते•
१) सीए राजगोपाल मिणियार
(सल्लागार, श्री राम जन्मभूमी तिर्थ क्षेत्र, अयोध्या)
(संचालक, महाराष्ट्र अर्बन को-ऑप. बँक फेडरेशन, मुंबई)

२) सीए निलाशा नोग्जा
(Bcom, FCA, DISA, Co-ordinator – Career Counselling Committee of ICAI)

c

Click here to see all photos…