YIN विभागीय, जिल्हा क्रीडा विभागीय, नेहरू युवा केंद्र महाराष्ट्र राज्य सरकार सांस्कृतिक कार्यक्रम 2023-24

 

 

फाऊंडेशन कोर्स इन काॅमर्स बॅच मधील विद्यार्थ्यांचा बक्षीस वितरण समारंभ संपन्न

दयानंद वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालय लातूर येथे दि. 10.04.2023 ते 10.05.2023 या दरम्यान महाविद्यालयाच्या पर्यवेक्षिका डॉ अंजली बुरांडे यांच्या संकल्पनेतून दहावी ची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांसाठी फाऊंडेशन कोर्स इन काॅमर्स चे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये विद्यार्थ्यांच्या विविध कलागुणांना वाव मिळावा व त्यांचा सर्वांगीण विकास व्हावा म्हणून शैक्षणिक अभ्यासक्रमाव्यतिरिक्त अनेकविध उपक्रम महाविद्यालयात चालविले गेले. जसे वादविवाद स्पर्धा, सुंदर हस्ताक्षर स्पर्धा, पर्सनॅलिटी डेव्हलपमेन्ट, लिडरशिप डेव्हलपमेन्ट, ग्रुप डिस्कशन, शब्दकोडे, संगीत व अभिनय मार्गदर्शन वर्ग. इ. या विविध स्पर्धांमध्ये सहभागी होऊन यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांना आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे समन्वयक प्रा. सुभाष मोरे यांच्या हस्ते शैक्षणिक साहित्य देऊन गौरविण्यात आले.यात चित्रकला स्पर्धेत ऋषीकेश वारद, प्रिया गरड, अवंती रणदिवे, हस्ताक्षर स्पर्धा सिद्धी बिराजदार, अंकिता राठोड, प्रेमनाथ चव्हाण, तसेच सांघिक स्पर्धेत तेजस्विनी कोळगिरे,, आदिनाथ, तन्वी देवप्पा या संघप्रमुखांना पारितोषिके देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी आपले मनोगत व्यक्त करताना करतांना समन्वयक प्रा. सुभाष मोरे यांनी महाविद्यालयातील शैक्षणिक सुविधा व भौतिक सुविधा विद्यार्थ्यांचा भविष्याच्या दृष्टीने कशा पुरक व पोषक आहेत यावर प्रकाश टाकला. संस्थेअंतर्गत चालणारे बी. काॅम, एम काॅम. सीए.,बी.सी.ए बी. बी ए या ज्ञानशाखा उज्वल भविष्याची संधी प्रदान करणार्‍या च आहेत असे प्रतिपादन केले. ,याप्रसंगी या वर्गाला मार्गदर्शन करणारे सर्व प्राध्यापक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सुवर्णा कारंजे यांनी केले तर प्रा. रेणुका महाळंगीकर यांनी आभार मानले.

 

 

 

जिल्हास्तरीय संस्कृत गीत गायन स्पर्धेत प्रथम क्रमांक

संस्कृत सप्ताहानिमित्त राजर्षी शाहू महाविद्यालय लातूर येथे संस्कृत विभागाच्या वतीने संस्कृत श्लोक, स्तोत्र, व गीतगायन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. त्यात लातूर जिल्ह्य़ातील अनेक विद्यालय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला होता. ही स्पर्धा विद्यालयीन, व महाविद्यालयीन अशा दोन गटात आयोजित करण्यात आली होती. त्यात दयानंद वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालयातील 11वी वर्गातील सृष्टी ढोक, प्रेरणा घोडके, ममता जाधव, मधुरा भैरप्पा, हर्षदा उपाडे, धनश्री, या विद्यार्थीनींनी सक्रिय सहभाग घेतला होता. संस्कृत भाषेतील मधुराष्टकम् चे अप्रतिम सादरीकरण केले. तबल्यावर शिवराज देशपांडे याने साथ दिली. संगीत विभागातील प्रा. स्वरांजली पांचाळ, प्रा. ज्योतिबा बडे, संगीत विभाग समन्वयक प्रा. सुवर्णा कारंजे यांनी या यशासाठी विशेष परिश्रम घेतले. 1100 रूपये रोख व प्रमाणपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. यशस्वी विद्यार्थ्यांचे दयानंद शिक्षण संस्थेचे अध्यक्ष श्री. लक्ष्मीरमणजी लाहोटी, उपाध्यक्ष श्री. रमेशजी राठी, सचिव श्री. रमेशजी बियाणी, कोषाध्यक्ष श्री. संजयजी बोरा, महाविद्यालयाचे प्र.प्राचार्य डॉ. राजाराम पवार, पर्यवेक्षिका डॉ. अंजली बुरांडे, समन्वयक प्रा. सुभाष मोरे, सांस्कृतिक विभागातील सर्व सदस्यांनी व महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले.

 

 

दयानंद वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालयात दि. 5.09.2023 रोजी सांस्कृतिक विभागातर्फे विद्यार्थी मंत्रीमंडळात उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी मंत्रीमंडळात निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन करतांना दयानंद शिक्षण संस्थेचे कोषाध्यक्ष मा. संजयजी बोरा. यात सांस्कृतिक विभाग, एन. एस. एस. विभाग, क्रिडा विभाग, भाषाविभाग, वाणिज्य मंडळातील विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली.
या मंडळातील विद्यार्थ्यांनी शिक्षक दिनाचा कार्यक्रम साजरा केला.

 

 

 

दयानंद वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालय , लातूर आयोजित, “तणावविरहित अध्ययन व भीतीमुक्त परीक्षा समुपदेशन व मार्गदर्शन”
दिनांक. 20 जाने.,वार शनिवार रोजी, दयानंद शिक्षण संस्था संचलित, दयानंद वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालय आयोजित, ” तणाव विरहित अध्ययन व भीती मुक्त परीक्षा समुपदेशन व मार्गदर्शनपर” प्रेरणादायी व्याख्यान दयानंद कला महाविद्यालयाच्या सभागृहात आयोजित केला. या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते जागतिक कीर्तीचे प्लास्टिक सर्जन डॉ. विठ्ठल लहाने उपस्थित होते. तसेच या कार्यक्रमास भुलतज्ञ डॉ.राजेश शहा, दयानंद शिक्षण संस्था कोषाध्यक्ष संजयजी बोरा, दयानंद वाणिज्य महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ.राजाराम पवार, उपप्राचार्य डॉ. गणेश लहाने, पर्यवेक्षिका डॉ. अंजली बुरांडे कोरे , समन्वयक प्रा.सुभाष मोरे तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व भावी उज्वल यशाची वाटचाल करणारे 12 वी बोर्ड परीक्षेला सामोरे जाणारे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या प्रसंगी कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते डॉ. विठ्ठल लहाने यांनी सांगितले , विद्यार्थ्यांनी अभ्यास करत असताना प्लॅनिंग व डिसिप्लिन या महत्त्वाच्या सूत्रांचा वापर करून अभ्यासाचे ,विषयाचे, तासाचे योग्य नियोजन करून, दैनंदिन वेळापत्रक तयार करावे. अभ्यासाची भीती न बाळगता आपल्या कर्तुत्वाने अभ्यास करून आपण मोठे होऊन आपल्या आई-वडिलांना देखील मोठे करावे. तसेच शिक्षका प्रती आदर ठेवावा शिक्षणाचे महत्त्व समजून आपल्या आयुष्याचे सोने करावे. तसेच त्यांच्या विविध अनुभवातून अमूल्य असे मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे मनोगत कोषाध्यक्ष संजयजी बोरा व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रा. सुवर्णा र्कारंजे यांनी केले.

 

 

 

 

महाराष्ट्र शासन क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य अंतर्गत व कृषी संचालनालय महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हास्तरीय युवा महोत्सव लातूर 2023 24 दयानंद वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालयातील संघास लोकनृत्य कलाप्रकारात प्रथम पारितोषिक प्राप्त झाले. सहभागी विद्यार्थी. अपर्णा पवार, कृष्णा गवळी, धनश्री गुटे, ओम कतारे, ईश्वरी सोनवणे, चैतन्य मस्के, नेहा नागरगोजे, आदित्य पवार.

 

 

 

 

महाराष्ट्र शासन क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य अंतर्गत व कृषी संचालनालय महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित नांदेड येथे संपन्न होणार्‍या विभागीय स्तरावरील युवा महोत्सवासाठी दयानंद वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालयातील लोकनृत्य संघाची निवड झाली.

 

 

 

जिल्हास्तरीय संस्कृत गीत गायन स्पर्धा
राजर्षी शाहू महाविद्यालय लातूर येथे आज संस्कृत विभागाच्या वतीने संस्कृत सप्ताहानिमित्त जिल्हास्तरीय संस्कृत श्लोक, स्तोत्र व गीतगायन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते त्यामध्ये
दयानंद वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालयास सामुहिक गटातून उत्तेजनार्थ पारितोषिक प्राप्त झाले आहे. यामध्ये हर्षदा उपाडे, मधूरा भैरप्पा, प्रेरणा घोडके, भाग्यश्री येलूरे, मयूरी जाधव, ममता जाधव, निकिता कदम, ममता घुटे, अपूर्वा वाडीकर, पौर्णिमा पाटील या विद्यार्थीनिंनी सहभाग घेतला होता.

सर्वांचे हार्दिक अभिनंदन 💐💐