दयानंद वाणिज्य (कनिष्ठ) महाविद्यालय,  लातूर

            दि. ०१/१०/२०२
राष्ट्रीय सेवा योजना

आज दि. ०१ अॉक्टोंबर २०२१ रोजी दयानंद वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालयात  दि. ०२ अॉक्टोंबर

 महात्मा गांधी जयंती या दिनाचे औचित्य साधून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी राष्ट्रीय सेवा योजना विभाग अंतर्गत रांगोळी स्पर्धा आज दि. ०१ अॉक्टोंबर २०२१ रोजी कनिष्ठ महाविद्यालयातील सभागृहात दुपारी ठीक १२:०० वाजता आयोजित करण्यात आली. कोव्हिड-१९ च्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करून रांगोळी स्पर्धा *ऑफ-लाईन पद्धतीने आयोजित करण्यात आली.

Bhosle Sakshi Bhanudas   12th ‘C’  Roll No – 10479  Mobile No – 8177835145    (First)

Soni Sejal Anil   11th ‘B’  Roll No – 30332 Mobile No – 8830141569   (Second)

Mishra Gajanan Prakash    12th ‘C’  Roll No – 10498  Mobile No – 8459202581 (Third)

द                            यानंद वाणिज्य (कनिष्ठ) महाविद्यालय, लातूर.
दि. १३/१०/२०२१.

                  राष्ट्रीय सेवा योजना                         निबंध स्पर्धा

आज दि. १३ ऑक्टोंबर रोजी दयानंद वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना व मराठी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने *”भ्रमणध्वनी शाप की वरदान” या विषयावर निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेसाठी अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाच्या पर्यवेक्षिका डॉ. अंजली बुरांडे, समन्वयक प्रा. सुभाष मोरे. यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. श्रीकृष्ण जाधव यांनी केले आज आयोजित निबंध स्पर्धेमध्ये इ.११वी व इ. १२वी मधून ७४ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला तसेच या स्पर्धेनंतर

कु. प्रणाली बेबीताई विठ्ठल चिकटे

शिक्षण – BSW (SRM college of social work Chandrapur )  या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी प्रमुख पाहुण्या म्हणून त्यांचे विचार मांडण्यासाठी उपस्थित होत्या त्यांनी पूर्ण भारत भ्रमण करण्याचा निश्चय केला आहे त्या अंतर्गत आतापर्यंत 28 जिल्ह्यामध्ये त्यांचा प्रवास झाला आहे.

पर्यावरण संवर्धन सायकल यात्री – कृती संदेश घेऊन संपूर्ण महाराष्ट्र भ्रमंती

उद्देश – पर्यावरण संवर्धन आणि  महिला सशक्तीकरण जनजागृती आणि लोकल परिस्थितीचा अभ्यास.

        सभोवतालील, दिवसेंदिवस बदलती उपभोगवादी जीवनशैली, वाढते प्रदूषण, तापमानवाढ, वातावरणदल, ऋतुचक्रबदल यातून निर्माण होणाऱ्या आरोग्याच्या आणि शेतीच्या समस्या लक्षात घेता, सध्या सायकलने प्रवास करत आदिवासी, ग्रामीण, शहरी भागात जाणे, स्थानिक संस्था, शाळा आणि सरकारी यंत्रणेतील अधिकारी व ग्राऊंड लेव्हल वर काम करणारी व्यक्ती यांना भेटी देणे व जनजागृती उद्देश ठेवून  माहिती पोहचविणे, शक्य तितकं लोकांशी समस्याबाबत  चर्चा करणे, संवाद साधत त्या- त्या भागातील परिस्थिती समजून घेणे, पर्यावरणाबाबत  मानसिकतेचा अभ्यास करत लोकल परिस्थिती समजून घेणे इ. आहे. आणि हा प्रवास आपला महाराष्ट्र जवळून अनुभवण्याचा, जगण्याचा, स्वतः चे अस्तित्व शोधण्याचा प्रवास आहे.

      मी सर्वसाधारण शेतकरी कुटुंबातील असुन, प्रवास हा माझा व्यक्तिगत आहे कुठल्याही शासकीय किंवा संस्थेमार्फत निघाली नसून, सोबत, ना कोणाची प्रवासाला स्पॉन्सरशिप आहे.  माझा प्रवास स्वजबाबदारीचा  असून लोकांकडे खाणे, राहणे असते. सोबत आर्थिक सह्योग सुद्धा लोकच करतात. प्रवास करत 11  महिने जास्त झाले. 14,000 (हजार) कि. मी. पेक्षा जास्त चा प्रवास झाला आहे. प्रवासात लोकांचा प्रतिसाद चांगला मिळतोय. अशा कोविडच्या काळातसुद्धा सहकार्य मिळत आहे. सोबत पर्यावरण हा विषय सर्वांच्या जाणिवेचा असल्याने प्रत्येक टप्प्यावर पोलीस वर्ग सुद्धा देखील त्यांना सहकार्य करीत आहे. त्यामुळे प्रवास सुरक्षितरीत्या सुरू आहे.

 माझ्यामुळे कोविडचे संक्रमण होऊ नये याची दक्षता घेऊनच त्यांचा प्रवास सुरू आहे.

   त्यांच्या या सायकल प्रवासात लोकांना सांगत असलेली मुख्य 5 संदेश  -ज्याचा संकल्प त्यांनी स्वतः घेतला असून, प्रत्येकाने वैयक्तिक पातळीवर प्रयत्न करणे काळाची गरज आहे असे त्यांनी सांगितले.

  1. आपल्या आरोग्यासाठी वायू व ध्वनी प्रदूषण टाळण्यासाठी, मोटारगाडीचा वापर टाळून, शक्य ती कामे सायकलने करू या.
  2. प्लास्टिक आणि बाटल्यांचा वापर टाळू यात. घराबाहेर पडताना कापडी पिशवी व पाण्याची बॉटल सोबत ठेवू या.
  3. परिसरात स्थानिक झाडे लावू या व जगवू या. अनावश्यक वस्तूंच्या गरजा टाळून, अत्यंत आवश्यक वस्तूंचा वापर करू या.
  4. आपला परिसर आपणच स्वच्छ ठेवू यात आणि आपले आरोग्य सुधारू या.
  5. ‘पाणी बचत व पाणी जिरवा’ या कामात सहभाग घेऊ या.

      या सर्व प्रयत्नांमध्ये जास्तीत जास्त व्यक्तींना सहभागी करू या. आणि स्वतः च्या कृतीतून संस्कार पुढे नेऊया….

आतापर्यंतचा प्रवास मार्ग –

 ( जिल्हा – तालुका नुसार )

आतापर्यंत 28 जिल्हेप्रवास केला आहे.

सायकल चालवा  पर्यावरण वाचवा असा संदेश त्यांनी आज या कार्यक्रमात दिला या कार्यक्रमास महाविद्यालयातील एन.एस.एस. कार्यक्रमाधिकारी प्रा. श्रीकृष्ण जाधव, प्रा. दिपक वेदे. प्रा. दिपक माने, डॉ ज्योती कुलकर्णी, प्रा. एस.एस. कुलकर्णी, प्रा. क्रांती तोडकर , प्रा.आशितोष साखरे, प्रा. सिद्धेश्वर ठाकूर , प्रा. घुले सर, यांची उपस्थिती होती व कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन महाविद्यालयातील हिंदी विभाग प्रमुख *डॉ. ईश्वरप्रसाद बिदादा यांनी केले व या कार्यक्रमास महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थ्यांची मोठ्या

संख्येने उपस्थिती होती.

दयानंद वाणिज्य (कनिष्ठ) महाविद्यालय लातूर.

आज दि. २० ऑक्टोंबर  २०२१ रोजी इ. ११वी व १२वी दयानंद वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालयात  राष्ट्रीय सेवा योजना व हिंदी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी महाविद्यालयाचे समन्वयक प्रा. सुभाष मोरे सर यांची प्रमुख उपस्थिती होती.

दयानंद वाणिज्य (कनिष्ठ) महाविद्यालय, लातूर.

एकपात्री प्रयोग स्पर्धा संपन्न

         राष्ट्रीय सेवा योजना व इंग्रजी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने दयानंद वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालय दिनांक 17/ 11/ 2021 रोजी एकपात्री प्रयोग स्पर्धा (Monologue Competition) घेण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.श्रीराम सोळंके होते, त्यांच्या हस्ते सरस्वती पूजन व दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. याप्रसंगी महाविद्यालयाच्या पर्यवेक्षिका डॉ. अंजली बुरांडे, समन्वयक प्रा.सुभाष मोरे रासेयोचे कार्यक्रमाधिकारी प्रा.दिपक वेदे उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. सोनाली कुलकर्णी यांनी केले.

           स्पर्धकांनी एकपात्री प्रयोगाचे सादरीकरण इंग्रजी, मराठी व हिंदी भाषेतून केले. अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ.श्रीराम सोळंके म्हणाले, आपल्या महाविद्यालयाची शैक्षणिक गुणवत्ता तर आहेच त्याच बरोबर विद्यार्थ्यांच्या कलागुणांना व कौशल्यांना वाव देण्यासाठी जे विविध कार्यक्रम आयोजित केले जात आहेत, त्यामुळे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी निश्चितच मदत होणार आहे.

      तसेच या कार्यक्रमाला लातूरचे विनोद वीर श्री बालाजी सुळ यांची प्रमुख उपस्थिती होती. त्यांनी विद्यार्थ्यांना एकपात्री प्रयोगाच्या सादरीकरणातील बारकाव्यांविषयी मार्गदर्शन करून अशा विविध स्पर्धांमध्ये सहभागी होण्यासाठी प्रोत्साहन दिले ,तसेच त्यांनी एकपात्री प्रयोगाचे सादरीकरण देखील केले.

       या स्पर्धेत कु. आगडे दिव्या ही विद्यार्थिनी सर्वप्रथम आली आहे.तसेच कु. समृद्धी पाठक ही विद्यार्थिनी द्वितीय आली असून कु.मृण्मयी पाठक व कु. श्रुती देशमुख या विद्यार्थिनी सर्व तृतीय आल्या  आहेत. या सर्व विजेत्या स्पर्धकांचा मान्यवरांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

      कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इयत्ता बारावी वर्गातील विद्यार्थी चि.ओंकार गव्हाणे व कु. रेवती जोशी यांनी केले. या स्पर्धेचे परीक्षक म्हणून प्रा. दिपक माने ,डॉ.ज्योती कुलकर्णी व प्रा.श्रद्धा जोशी यांनी काम पाहिले. प्रा. क्रांती तोडकर यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले. स्पर्धेच्या यशस्वितेसाठी इंग्रजी विभागाच्या सर्व प्राध्यापकांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमाला सर्व प्राध्यापक ,प्राध्यापिका व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.